Ad will apear here
Next
थाटात झाले तुळशीचे लग्न
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा सोहळा

पुणे : मंगलाष्टकांचे सूर... राधेकृष्ण, गोपालकृष्ण असा जयघोष... वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला... वाद्यांचा घोष... हे दृश्य होते श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळ्याचे. दर वर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे श्रीकृष्ण-तुलसी विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.  


या वेळी ट्रस्टचे पदाधिकारी सुनील रासने, महेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, मंदार मोडक यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक हजर होते. 

शामसुंदर पारखी शास्त्री यांनी विवाहसोहळ्याचे पौरोहित्य केले. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. तुलसी वृंदावन आणि श्रीकृष्णाची मूर्ती डोक्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली. प्रभात बँड आणि दरबार ब्रास बँड मिरवणुकीत वादन करत होते.


चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करत, श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर विवाह समारंभ झाला. उपस्थित भाविकांनी श्रीकृष्ण-तुलसीचे दर्शन घेतले. समाजाच्या आरोग्यासाठी, सुखासाठी प्रार्थनाही करण्यात आली. 

(या तुलसीविवाह सोहळ्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZPNBU
Similar Posts
दगडूशेठ गणपती शहाळ्यांमध्ये विराजमान पुणे : ‘वैशाखवणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ सहन करण्याची ताकद मिळावी, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्नपणे सुटाव्यात,’ असे साकडे पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपतीला घालण्यात आले. त्या निमित्ताने १८ मे रोजी दगडूशेठ मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता
माऊलींचे अश्व देणार दगडूशेठ गणपतीला मानवंदना पुणे : पंढरपूर वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत असणारे मानाचे अश्व पुण्यात आल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मानवंदना देणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम होत आहे. रविवारी, २३ जून रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता हा सोहळा होणार आहे.
नवोदित कलाकारांसाठी मोफत अभिनय कार्यशाळा पुणे : गिरीश देशपांडे आणि माणुसकी फाउंडेशन यांच्या वतीने नवोदित कलाकारांसाठी मोफत अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन करण्यात आले आहे.
अंगारक चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक सजावट पुणे : अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून, अत्यंत आकर्षक अशी ही सजावट डोळ्याचे पारणे फेडत आहे. पहाटेपासूनच भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी येथे गर्दी केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language